फक्त एकदा......

Started by Mayur Jadhav, June 12, 2014, 11:05:18 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

फक्त  एकदा तूच सांग यडुले
या माझ्या नयनी कोण तुला दिसते ,
फक्त  एकदा माझ्याकडे  पाहून  तर बघ सखे
हे माझे काळीज कसे गहिवरून हसते ,
फक्त  एकदा माझ्यात डोकावून तर बघ प्रिये
हि माझी वेळही कशी तुझ्यासाठीच थांबते ,
फक्त  एकदा ऐकून तर बघ शोनुले
हे माझे हृदय तुझ्याच नावाने कसे धडकते ,
फक्त  एकदा माझ्याकडे येउन तर बघ स्वप्न परे
हे जीवन तुझ्यासाठीच आनंदाने कसे बहरते ,
फक्त  एकदा मला विसरून तर बघ यडुले
ही नियतीही तुला प्रत्येक क्षणी कशी माझी आठवण करून देते .

   मयुर जाधव
  ( कुडाळ ) सातारा   
  +918888595857.