तारा...

Started by शिवाजी सांगळे, June 13, 2014, 06:13:35 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे







ताऱ्याची का चूक झाली?
झुगारून ती सारी कक्षा,
एकटाच उतरला तो खाली !

अवकळा का नभी आली?
तारांगण रिते का झाले?
कि नव पोकळी निर्माणली?

उल्का प्रलय होत रहातो
पडझड तर नियम सृष्टीचा
झुगारून देणे, अपवाद होतो !

म्हणतात, तारा तो निखळतो
विलय कि अस्त तो त्याचा?
मात्र जीवन स्वत:चे जगतो !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९