एक मोह सावळासा

Started by विक्रांत, June 13, 2014, 08:25:45 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

एक मोह सावळासा 
माझ्या मनात दाटला
रे नभा सांभाळ मला
करून मज सावळा

तीच वेणू गात्रातून
आज पुन्हा सुरावते
प्रिय सखी दूर कोठे
वाट माझीच पाहते

जरा हासता मुग्धशी
ताऱ्यास जाग आणते
आणि वेडे भान माझे
दशदिशात धावते
 
काहीतरी बोलतांना
काही तरी होत होते
मोरपीस डोळ्यावरी
कानी तेच गीत येते

प्राणातील हाक ओठी   
हाकेमध्ये प्राण माझे 
कडाडणाऱ्या विजेचे
भोवताली लोळ भाजे

तीच करुणा सावळी
अन बेभान बिजली
पडू दे हृदयावरी
आग अनावर ओली 

विक्रांत प्रभाकर