दुर नभातुन पाऊस आला

Started by SONALI PATIL, June 14, 2014, 11:43:53 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL



दुर नभातुन पाऊस आला,
घेवुन प्रेमाच्या सरी वर सरी।

सख्या सांग तुरे,
तुझ्या विना कसे गाऊ मी पावसात प्रित गाणी।

पावसात या मन ओले चिंब भिजले,
आठवनीत तुझ्या त्याने ,पुसले अश्रु सारे ।

क्षणा क्षणात आठवनीत मन पुन्हा वाहुन गेले,
पावसात या भिजता भिजता,

नकळत होडी ह्रदयाची तुज कडे गेली,
जाताना तिने वादळवार्याची तमा न बाळगली।

भेटेल येऊन तुला अण
मारेल कडकडुन जुनी मीठी।

गार गारव्याने मन गुलाबी,
बेधुंद होवूनी गेले।

सख्या आठवनीत तुझ्या गायील मी,
प्रितीचे मधुर गाणे ।

असे वाटते नभातून मीच बरसत आहे,
तुझ्या कडे येण्याचा,हा मार्ग अवखळ आहे ।

थेंबा थेंबातुनी वाहतात तुझ्या आठवनी,
केवील वाने मन पाखरू,
घरट्या विना पोरखे।

सख्या तुझ्याच सोबत,चिबं चिबं पावसात भीजुन,
गायचे रे मला प्रितीचे गाणे ।

सुवर्ण चाफा मना मनाचा,
तो गंध ओल्या मातीचा,
तुझ्या सोबत जीवनात आला।

कसे सागुं तुला
तुझ्या विना एक एक क्षण मजला
युगा युगाचा झाला ।