पालखी

Started by vijaya kelkar, June 14, 2014, 04:03:01 PM

Previous topic - Next topic

vijaya kelkar

   पालखी
आता लेक येणार 'मृगाची सर 'बनून
माय तयार मायेचा पदर पसरून
टोचरा चारा,तणकाटा झटकला
टोचेल बाई नाजूक नवेलीला
लाल-पिवळ्या फुलांचा सडा शिंपला
मोगऱ्याचे अत्तर चारी दिशेला
खळखळ वडाची,सळसळ पिंपळाची
थांबली! तारांबळ भीतीने उडायची
निरोप देण्या कोण जाईल बरे?
प्रश्न पडला-आडोशाला लपली कबूतरे
भावाच्या अंगात शिरले वारे
गोल-गोल गिरकीत धावले वारे
लाडकी, घना मागे होती लपलेली
सखी पाठीराखीण वीज डोकावली
निळ्या आकाशाच्या काळ्या महाली गेली
कडकदार आवाजात आज्ञा झाली
टप-टप-टप स्वार निझाले पुढती
निघाली ती पालखी मागुती .........
                विजया केळकर __