आठवणीने तुझ्या..........

Started by Mayur Jadhav, June 17, 2014, 08:42:41 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

आठवणीने तुझ्या........

आठवणीत तुझ्या नाही आवरता
आले अश्रूंना माझ्या ,
एक आला हुंदका अन झापडं मिटली तरी
नाही सावरता आल्या आठवणी तुझ्या ,
अजून किती वाट पहावी तुझी हे विचारता मनाला
तेही गहिवरले आठवणीने तुझ्या ,
काळजाने एक साद घातली तुला अन त्याचाही
आवाज अनावर झाला आठवणीने तुझ्या ,
ऐकू येईल कधीतरी तुला आवाज या भावनांचा अन मग
तूही यडूले भान हरपशील आठवणीने माझ्या ,
विश्वास आहे मला की तूही कधीच विसरणार नाहीस मला पण
थांबव आता वेडं झालय हे मन टपोरी आठवणींनी तुझ्या .     

मयुर जाधव ,
कुडाळ ( सातारा ),
+918888595857.


DAKE SAMBHAJEE

HI.........
              NICE POEM...........

Mayur Jadhav



Tejas khachane

आठवणीनी तुझ्या अंग शहारून आले
ओठही माझे तसे निशब्द झाले
श्वासांचा तुझ्या हुंदका ह्रिदयात जसा माझ्या
तसे आठवणींनी मला वेड लावलाय तुझ्या

खूप सुंदर

Maroti Miratkar


Mayur Jadhav