पाऊस येताच

Started by SANJAY M NIKUMBH, June 17, 2014, 10:49:12 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पाऊस येताच तुझा चेहरा
थेंबा थेंबात दिसू लागतो
माझ्या मनातल्या प्रेमाचा
पिसारा मग उमलू लागतो

तू दूर असूनही मी
तुझ्याभवती पिंगा घालतो
भास आभासाच्या खेळात
तुझ्यासंगे खेळू लागतो

शब्द शब्द तुझा होऊन
काळजात फुलू लागतो
नकळत कोऱ्या कागदावर
तुला घेऊन बहरू लागतो

प्रत्येक अक्षरांत पुन्हा तुला
वेड्यासारखा मी निरखू लागतो
कुणा वाटे करतो कविता
मी फक्त भावनांना मोकळे सोडतो
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि.१७.६.१४  वेळ : १०.३० रा .     

umesh kumbhar

chaan bolun mi mazya bhavana mukta karatoy