गोधडी मायेची

Started by SONALI PATIL, June 18, 2014, 10:24:32 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

  गोधडी मायेची

माय माझी मज साठी
आली बनुन कुडंल-कवच,
गंगे समान पविञ ह्रदय
वेळोवेळी वाहून नेले,
मजला किनारी आणुन ठेवले ।
चिंध्या चिध्या झाल्या देहाच्या,
जिझली ती आम्हा साठी
ऊन पाऊस झेलून तिने,
आम्हास दिली छञ -सावली ।
चिमटा काढून पोटाला,
घास भरवीला आम्हाला।
ठिगळा-ठिगळा चिंध्यांची गोधडी,
ऊब तिची मखमली ।
देह ज्योत तुझी,
अखंड तेवली आम्हा साठी
जरी झाली राखुंडी,
आम्हास आहे भस्मासमान ती..
लावील गर्वाने कपाळी,
भस्म माझ्या ललाटी ।
राहून गेले स्वप्न तुझे
पहा तु माझ्या डोळ्यातुनी..
आई प्रित्यार्थ जगने आहे,
तुझ्या स्वप्नांचा तर हा देह आहे ।
पंचतत्वात मिळूनी गेला देह तुझा,
तरी कना कना तुनी मजला
रोज सहवास तुझा लाभला ।
जोवरी श्वासात श्वास माझ्या,
लाभते मला तुझी छञ छाया ।
येवो वादळ,ऊन,पाऊस,वारा
गोधडी मायेची मी पांघरली आहे ।

Mahendra Ratate


Rajkanishka Waghmare

कवितेच्या ओळी मनाला खूप भावल्या..पण त्या पुढे मागे झाल्या आहेत