मी आणि मन (म्हणजे मीच )

Started by विक्रांत, June 19, 2014, 08:14:01 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



मनास एकदा सांगितले मी
जरा शहाणे व्हायला
ते होवून तत्वज्ञानी
लागले मलाच शिकवायला

कधी समजावले प्रेमाने
जरा नम्र व्हायला
ते वाकुनि दुष्टपणाने
लागले पाय ओढायला

आणि एकदा वदलो उगाच 
डोळस भक्ती करायला
सजूनधजून भक्त मिळवून 
लागले देव्हारी बसायला

मी माझ्या मनाला लावले
सेवा करयाला
ते होवूनिया पोशाखी
लागले जगात मिरवायला

भरले गच्च पाहून त्याला
सांगितले विकार सोडायला
ते होवुनी संभावित
लागले जग वाईट म्हणायला

अन शेवटी जरी प्रार्थिले 
शांत बसायला
लगेच समोर लागले ते
विश्व गोळा करायला


विक्रांत प्रभाकर