प्रेम भाव ।

Started by SONALI PATIL, June 20, 2014, 03:43:07 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL




विखुरली ही मने सारी
विखुरला हा प्रेम भाव ।
धागा बनूनी प्रेमाचा,
ओवावी मोत्यांची माळ ।
मानुसकीच्या नात्या मध्ये
झाली मोठी दरी निर्माण..
द-या खो-यातुन वाहत जावे
नदी परी महान...
दुवा बनुनी पाण्याचा
एक व्हावी वाट ।
विखुरली ही मने सारी
विखुरली मानुसकीची वाट ।
स्वातंञ्याचे,विभक्तीची चढली भुते
झपाटलेल्या विचारांना  जरा भानावर आणु
प्रेमाच्या मंञाचा छिडकाव करूनी,
एका छता खाली आणु ।