पावसारे ...

Started by शिवाजी सांगळे, June 24, 2014, 03:20:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




होत मन उदास
कधी कधी एकट्यात
वाटत भिजवून डोळे
घ्यावेत चिंब पावसात!

बरं होईल भिजल्यावर
डोळ्यांना अन मनाला
नकळत, साऱ्यांच्या देखत
बहाण्याने तूझ्या रडायला!

आताशा पावसा तू
स्वतःच दडी मारलीस
दुख: आपले गिळून
आमचीही गोची केलीस!

येरेयेरे पावसा, जरी
कायम म्हणत होतो
खोटे पैसे, खरोखरच
कधीच देत नव्हतो!

तरी मित्रा, आता
तू धुवांधार बरसावं
मनाला अन डोळ्यांना
पुन्हा एकदा भिजवावं


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९