निर्णय.....

Started by pomadon, June 24, 2014, 08:34:18 PM

Previous topic - Next topic

pomadon

                                           निर्णय......
निर्णय घेता न येणे या सारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे हे अधिक बरे.
चुकीचे निर्णय घेणा-या माणसांनी जीवनात यश  मिळविले आहे.
परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही, ज्याचे मन "हे की ते" च्या गोंधळात गुरफटलेले असते असा मनुष्य मात्र कधीच यशस्वी झाल्याचे ऐकिवात नाही.
ज्याला निर्णय घेत येत नाही त्याला कृती करता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.
आपल्या आयुष्यात सा-याच घटना आपणांस हव्या असतात तशाच घडतात असे नाही.
अन ज्या घडतात त्या सा-याच आपणांस अप्रिय असतात असेही नाही.
"उलट काही काही अनपेक्षित घटनाच आपल्याला कमालीचे सुख व आनंद देतात, असे अनेक वेळा दिसून येते".