!! आरती स्वामींची !!

Started by शिवाजी सांगळे, June 27, 2014, 01:54:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ

नामतव घेता मात्र
उरे आम्हा जीवनी अर्थ !

मोह दूर सारुनी
करावे देवा जीवन सार्थ !

करता ध्यान, साधना
समजुदे तव नामाचा अर्थ !

दयावी शक्ती, भक्ती
कष्ट जाउनी राहो परमार्थ !

अक्कलकोटी दयावे दर्शन
राहो आम्हा ईतकाच स्वार्थ !

मागणे सकळ शिवाचे
दयावे आम्हा मोक्षाचे तीर्थ !

© शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९