तूच माझा प्राजक्त

Started by SANJAY M NIKUMBH, June 29, 2014, 07:28:20 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तूच माझा प्राजक्त
=============
तू कुठेही असलीस तरी
तुझा गंध मनांत दरवळतो
तूच माझा प्राजक्त
मी तुझ्यातच हरवतो

जेव्हाही येतो तुला भेटण्यास
तो गंध वेड लावतो
तू निघून गेल्यावरही
श्वासांत विरघळत रहातो

तू येत आहेस भेटण्यास
तो गंधच निरोप देतो
तो गंध माझ्या काळजास
तुझा करून टाकतो

माझ्या मनाच्या अंगणात
प्राजक्ताचा सडा पडतो
जरी तू नाहीस जीवनात
त्या गंधात तुलाच पाहतो
------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. २९. ६. १४ वेळ : ७. २० रा .