येरे घना...

Started by शिवाजी सांगळे, July 01, 2014, 06:59:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे






ओथंब रे, जलधी ओथंबुनी ये
नदि, पात्र सारे आटलेले !

थांब रे, घना होऊन श्यामल
तरू, तन बघ व्याकुळलेले !

धाव रे, जलदा घेऊन धाव
पशु, पक्षी इथे आतुरलेले !

बरस रे, मेघा आक्रसुनी नभाला
जन, मन हे तहानलेले !

येरे घना, येरे घना त्वरी धावुनी
नेत्र, तुजविन मात्र पाणावलेले !


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Subita VN


शिवाजी सांगळे

सुबीता, धन्यवाद
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९