ती... रात्र होती

Started by शिवाजी सांगळे, July 04, 2014, 09:51:57 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



शोषून गंध मोगऱ्याचा
दरवळत रात्र होती !

धुंद सुगंध स्वासांचा
साठवित रात्र होती !

गात्री हळूवार स्पर्शानी
रोमरोमात रात्र होती !
 
पिउन चांदणे सुखाचे
तहानलेली रात्र होती !

तुझ्या नी माझ्या
मिलनाची रात्र होती !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९