***आश्रीत ***

Started by SANJAY M NIKUMBH, July 05, 2014, 08:29:31 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

***आश्रीत ***
===========
भरलेला संसार असतांना
माझ्या घराची मीच होते राणी
जे काय होतं ते सारं मी जमवलेलं
तिनका तिनका जोडून घर सजवलेलं

त्याने जे काय कमवलं
त्यातच जगले मी सुखी आयुष्य
त्याच्यासंगे हसत खेळत कधी दुख्खांना सामोरे जात
फुलले मी अन त्यालाही फुलवलं

एक समाधान निरंतर ओसंडून वहात असे
माझ्या चेहऱ्यावर नेहमीच
पिल्लांसोबत त्यांना मोठं करतांना
आयुष्याच्या संध्याकाळी चाललेली माझी वाटचाल

पण एक आघात झाला अन सारं संपल
अवेळी त्याला माघारी बोलावून देवानं सुख हिरावलं
तरीही मी जगले न डगमगता
कारण त्यांच्या आठवणी अन निशाणी होती माझ्यासोबत

आज ते तर सगळं स्वप्नच वाटतंय
काल आणि आज यातलं अंतर मन पोखरतय
आज मुलाचा संसार बहरलाय
पण तेच घर मला खायला उठ्तंय

कालपर्यंत पदर धरून फिरणाऱ्या मुलाला
दुसरा पदर मिळालाय
आता मी अडगळ होऊन जगतेय
माझ्याच घरात एखाद्या आश्रीतासारखी .
===========================
संजय एम निकुंभ , वसई
दि . ४. ७. १४ वेळ : ६.४५ स .