प्रीतगंध

Started by aap, July 08, 2014, 02:57:22 PM

Previous topic - Next topic

aap

प्रीतगंध

नच उमगले तुला, मला
पाहता पाहता प्रीत गंध दरवळला

रेशमी स्पर्श तुझा
देह देही मोहरला

हसरे डोळे अन खळी कपोली
मोहविले तू मला

डोळ्यातुनी तुझे बोलणे
ठाव काळजाचा घेतला

स्वप्न म्हणू कि सत्य म्हणू हे
हृदयी सूर झंकारला 

प्रीत गंध दरवळला
प्रीत गंध दरवळला

सौ . अनिता फणसळकर