!! भुक वैष्णवांची !!

Started by शिवाजी सांगळे, July 08, 2014, 08:00:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे





घन दाटलेला, नभ आतुरलेला,
माहेरी पंढरी, जीव जडलेला !

वारकरी ढग, ओथबुन वाहे,
सोहळा भक्तीचा, रखुमाई पाहे !

भेट माहेराची, घडो क्षणोक्षणी,
येतसे टचकन, डोळ्यात पाणी !

सखा पंढरीचा, उरे सुखापारी,
भुक वैष्णवांची, आषाढ वारी !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९