दिवस सारा अंधारला...

Started by शिवाजी सांगळे, July 12, 2014, 08:41:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे





पागोळीत, पाऊस थेंब,
अलगदच घरंगळला !
आतुरल्या प्रेयसीच्या
नेत्री, अश्रू ओघळला !!

दाटला, गर्द नीरनभ
कंठ प्रतीक्षेत गहिवरला !
नाजूक, कोमल अधरी
अस्पष्ट, हुंदका अडला !!

येईल, साजन केंव्हा?
पाऊस पुन्हा गडगडला !
नाही चाहूल पावलांची
दिवस सारा अंधारला !!

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९