दिव्या दिव्या दीपत्कार

Started by aap, July 13, 2014, 04:45:23 PM

Previous topic - Next topic

aap

दिव्या दिव्या दीपत्कार

दिव्या तुझी स्थित्यंतरे
आम्ही भाग्यवान खरे

जगती तू या नसतास
डोळे असुनी दिसले नसते रात्रीच्या अंधारात

प्रथम होतास तू दिवटी
गरिबांच्या राहुटी

मग मातीची झाली पणती
तिन्हीसांजा मिणमिणती

समई निरांजन देवादारी
म्हणा परवचा शुभंकरी

काचकंदील घरोघरी
हंड्या , झुंबर राजमंदिरी

ग्यासबत्ती शिरावरती
रात्रीच्या निघती वराती

कालांतरे झाली प्रगती
गावोगावी  विजबत्ती

झगमगती मंदिर शिखरे
प्रकाशती घरेदारे

स्वतः जळूनी देतोस तू प्रकाश
तव वर्णाया अपुरा शब्दकोश

सौ . अनिता फणसळकर