पुष्प छंद...

Started by शिवाजी सांगळे, July 17, 2014, 12:41:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे





केवडयाचा गंध 
केव्ह्ढासा संग?
दरवळे अंग अंग !

रंगात वैविध्य
गुलाबाचा सुगंध
काटयांशी संग !

मोगरा शुभ्रांग
मोकळ्यात मंद
गजऱ्यात बेधुंद !

पितकेशरी रंग
पाकळीत कंद
झेंडू देई आनंद !

त्रीरंग विविध
नित्य जास्वंद
देव्ह्राऱ्यात दंग !

पाहताच आनंद
चाफा सोनरंग
मंद स्वर्गीय गंध !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९