गुरुजी !!!!

Started by विक्रम पाटील दिग्दर्शक, July 18, 2014, 01:01:05 AM

Previous topic - Next topic
गुरुजी !!!!

कधी अंधुक कधी स्पष्ट , नकळत शाळाही आठवणीतून जात राहिली
पण गुरुजी तुमची आठवणी मात्र कायम येत राहिली

कधी कधी कवितेतली ओळ आणि गणितातला घोळ
नकळत विसरायचा ,,, पण तुमचा चेहरा मात्र सतत समोर दिसायचा
छडी लागताना होणार्या वेदना आता आठवणीत नाहीत ,,,,
पण तुम्ही दिलेली माया सतत आठवत राहिली
कधी अंधुक कधी स्पष्ट , नकळत शाळाही आठवणीतून जात राहिली
पण गुरुजी तुमची आठवणी मात्र कायम येत राहिली

तुम्ही लावलेल्या ज्ञानरूपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले
त्या वटवृक्षाच्या सावलीत आज कित्तेक जन साक्षर झाले
नुसतं ज्ञान नाही तुम्ही माणूस म्हणून जगायला शिकवलत
कधी खदखदून हसवलत ,,, कधी कधी खूप रडवलत
पायथागोरस आणि न्यूटन हि मंडळी सुद्धा कधी खूप मागे राहिली
कधी अंधुक कधी स्पष्ट , नकळत शाळाही आठवणीतून जात राहिली
पण गुरुजी तुमची आठवणी मात्र कायम येत राहिली

तुम्हाला एकदा पाहण्यासाठी मी पुन्हा शाळेची वाट धरली
तुम्ही गेल्याचे कळताच पायाखालाली वाळू सरली
आज निर्जीव शाळा मी खूप जवळून पहिली
मी माझी सगळी विद्या ,,, गुरुजी मी तुमच्या पायावर वाहिली
कधी अंधुक कधी स्पष्ट , नकळत शाळाही आठवणीतून जात राहिली
पण गुरुजी तुमची आठवणी मात्र कायम येत राहिली

विक्रम पाटील दिग्दर्शक

rahul badgujar