उठवू नको ना आई मला

Started by dsp, July 18, 2014, 04:10:48 PM

Previous topic - Next topic

dsp


सकाळी एक स्वप्न पडले होते.
स्वप्नात प्रियासी आली होती.
जीला सारख भेटता येत नाही,
मनसोक्त बोलता येत नाही.
अशी ती स्वप्नात यावी.
मस्त स्वप्न रंगल होत तितक्यात आईने
आवाज दिला "उठ खूप उशीर झालाय "
अशा वेळी सुचलेली कविता.....

उठवू नको ना आई मला
अजुन थोडं झोपू दे
भेटायला आली सुन तुझी
जरा मनसोक्त तिला भेटू दे

वेळ नसतो कधी तिला ग
भेटत नाही बोलायला
मनातल्या गोष्टी मनातच राहतात
संधीच नसते सांगायला

भेटावे म्हटले कधी तिला तर
भेटताच सुरुवात निघायला
पाहिल कोणी म्हणून घाबरते
आता कोणीच नाही पहायला

लाजते थोडी,घाबरते ही
चार -चौघात कधी ती बोलत नाही
एकांत भेटलाय आता कुठे तर
स्वप्न आता हे तोडवत नाही

थांबना ग आई थोड,
थोड अजुन बोलू दे
इतक सुंदर स्वप्न पडलय
स्वप्नातच थोड जगू दे...!!!