एका लग्नाची गोष्ट

Started by विक्रम पाटील दिग्दर्शक, July 20, 2014, 02:59:23 PM

Previous topic - Next topic
शुक्रवार चा योगायोग पुन्हा पावसाने घडवून आणला

२९ जुलै २००५

महाभयानक मुसळधार पाऊस,,,,,,,

कृष्णेने महाभयानक रूप धारणा केले होते ,,,,

संपूर्ण सांगली पाण्याने ओढली होती ,,,

तिच्या घराच्या ,,, उंबर्यापर्यंत पाणी आले होत ,,,,,,,,

लग्नाचा दिवस ठरला होता रविवार ३१ जुलै २००५,,,,,,,,,,,,,,,

पहिला साखरपुडा शुक्रवार ७ नोवेंबर २००३ ,,,, लग्न शुक्रवार २८ नोव्हेंबर २००३

हे मी काहीच ठरवलं न्हवत ,,,,,, सगळं योगा योगाने घडत होतं ,,,,,,

आणि मला वाटत पण होतं ,,,,, या वेळा हि असंच होणार काही तरी ,, रविवारी नाही होणार काही

जे काही घडतं आयुष्यात ते फक्त शुक्रवारीच घडलं आहे

कोण कितीही ठरवू दे जर माझ्या नशिबात काही असेल तर शुक्रवार जुळून येतो ,,,,,,,,

मी आकाशाकडे पहिल ,,,,,,, आणि नदी कडे ,,,,,

क्रिष्ण हसली माझ्या कडे बघून ,,,,,,, गुरुवारची संध्याकाळ ,,,,,,,,

जसं मी क्रीश्नेला आदेश द्याव्या आणि तिने माझं ऐकावं ,,,,

एका रात्रीत १५ फुट पाणी वाढले ,,,,, सासुच घर संपूर्ण पाण्यात ,,,,,

लग्न पुढे ढकलूया ??? ? सासू सासरे म्हणाले ,,,,,

मी म्हणालो नाही ,,,,, एक तर कधीच होणार नाही ,, आणि करायचे असेल तर त्याच तारखेला

पण अश्या पाण्यात ,,, महापुरात कसे , शक्य आहे ,,,,

रावीपार पर्यंत तर खूप च वाईट हाल होतील सगळ्याचे आणि आता सगळी तयारी करणे नाही जमणार

कसली तयारी अन काय ,,,,,,

रविवार नाही जमणार ना ,,,, ठीक आहे ,,,, आज शुक्रवार आहे ,,,,,

घरातले आहे ते समान काढा ,,,,, मी राणीला बरोबर घेवून जात आहे ,,,,,,

आणि जाताना वाटेत ,,,,,, देवळात लग्न करून घेवून जाईन ,,,,,

कुणाला यायचे असेल तर या ,,

मग आली सगळी ,,,,,,,,,

आणि पुन्हा योगा योगाने शुक्रवार २९ जुलै २००५ ला मी व राणी विवाह संपन्न झालो

ती महापुरातून माझ्या घरी वाहून आली ती कायमचीच !!!!!!!

विक्रम पाटील दिग्दर्शक