1996 a Love Story

Started by विक्रम पाटील दिग्दर्शक, July 20, 2014, 03:03:25 PM

Previous topic - Next topic
उसने बात की, कुछ ऐसे ढंग से
सपने दे गायी , वो हज़ारो रंग के,,,,,,,,,,,,,,

१९९६ ,,,,,, मी एका कॉम्पुटर institute मध्ये शिपाई म्हणून काम करीत होतो,,,,,,,
बारावी कॉमर्स असल्यामुळे लेक्चर सकाळी १० ला गुल ,,,,,
११ ते ६ ड्यूटी ,,,, आणि ,,,, ६ नंतर आणखी एक शाखा होती ,,,, तिथे मी जाऊन कॉम्पुटर शिकत होतो ,,, institute चा मी सदस्य असल्यामुळे मला PC, library बुक्स, सगळा फ्री होतं.........

तसा १ वर्षात मी बराच ट्रेन झालो होतो ,, microsoft ऑफिस वगेरे ,,,, आता कंटाळा आलेला,,,

नवीन काहीतरी शिकव म्हणून ,,,,, मी "C " language शिकायला हातात घेतलं,,,,

रोज ७ ते ९ मी practice करीत बसलेला असे ,,,,,,, दिवस खूप छान चालले होते,,,,,,,

अधून मधून चेस ,,,, कॉम्पुटर ला हरवण्यात मला खूप मझा यायची ,,,,,,,,,

ह्या शाखेत कोणीही येत नसे फक्त आणखी एक म्याडम होत्या ,, as instructer म्हणून ,,,,

त्या पण तिथे practice साठी असायच्या ,,,,, साधारण ८ ला त्या जायच्या मग मी एकटा निवांत बरोबर १२ PC ,,, सतत काही न काही माझे प्रयोग चाललेले असायचे,,,,,,,,

एके दिवशी असाच ,,,, एकटाच प्रोग्रामिंग करताना ,,,

एक गोड आवाज कानावर आला ,,,,"" Sir, may I coming ?" ,,,,,,

मी pc वरून वर पहिल,,,,,, आणि पहातच राहिलो ,,,,,,,

काही योगायोग पण खूप सुंदर घडत असतात ,,,, PC वर गाणं पण काय मस्त ,,,,,

""" चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कँवल,
या जिंदगी के साज़ पे छेड़ी हुई गज़ल,
जाने बहार तुम किसी शायर का ख़्वाब हो..
चौदहवीं का चाँद हो..""""

" सर,, ,,,,, मला सरांनी इकडे practice करायला सांगितली आहे,,, हि शाखा मला जवळ पडते ,,,,,, मी रोज रात्री ८ ते ९ practice केली तर चालेल ना,,"

मी कशाला नाही म्हणू ,,,,, आणि सरांनी सांगितले आहे म्हणाल्यावर मी काही नाही बोललो ,,,,,,

ती रोज practice ला येवू लागली ,,,, मी आपलं "C " language मध्ये नव नवीन प्रयोग आणि चेस मध्ये कायम गुंग ,

तिला pc चा, अ, आ, इ, पण माहिती न्हवता ,,,, सकाळी जे लेक्चर व्हायचे त्यातील नोटस घेवून ती practice करू लागली ,,,,

म्याडम ८ ला गेल्या मग तिथे परत instructer कोणी नसायचे ,,, ती मलाच instructer समजायची

तिला खूप शंका यायच्या ,,,, मग ती मला दर वेळा विक्रम सर ,,,,, प्रोब्लेम आहे ,,,,,, हे जरा सांगा न कसे करायचे ,,,,

मला ती सर म्हणाल्याचे मला खूप छान वाटायचे ,,,, म्हणून मी हि नाही सांगितले काही ,,,, कि मी सर वगेरे काही नाही ,,, पण मला जर माहित आहे तर सांगायला काय हरकत म्हणून मी आपलं सांगत गेलो ,,,, सांगत गेलो ,,,,,

तीन महिन्यात आमची जाम मैत्री झाली ,,,,,, ती पण १२ वि कॉमर्स ,, मी पण १२ वि कॉमर्स ,,,,

******************** क्रमशः ************************************************************