Dukh

Started by विक्रम पाटील दिग्दर्शक, July 20, 2014, 03:09:02 PM

Previous topic - Next topic
माझ्याच संहिताचे
आत्म्यास भार आहे
माझे मी पण नडले
जगणे दुखत आहे

अडकुनी मीच वेडा
नात्यात ओढ नाही
कधीच न कळले
बाकी शुन्य आहे

एका क्षणात आले
एका क्षणात गेले
न जमणारा मेळ सारा
आयुष्य खेळ आहे

हे सोंग छान वठले
केल्या उगीच बाता
तुझे म्हणून गिळले,
सारे तुझेच आहे.

विक्रम