त्रिविधताप

Started by aap, July 20, 2014, 04:01:22 PM

Previous topic - Next topic

aap

त्रिविधताप

वासनेतून मनुष्य जन्म होतो . माणसाचे शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेले आहे . तर माणसाला त्रिविध ताप चुकले नाहीत  तर तो त्यांना
मिळालेला आहेर आहे
तर हे त्रिविध ताप कोणते . पहिला आहे आदी आत्मिक ,दुसरा आहे आदि भॊतिक , तर तिसरा आहे आदि दॆविक .
आदी आत्मिक तापामध्ये हा शारीरिक ताप समजला जातो तो कसा तर काही जन्मताच अंध,अपंग ,मुके, बहिरे,मतीमंद असतात.काहीना
शारीरिक व्याधी ,कॆक प्रकारचेरोग मग त्यात अस्थि ,हृदय ,किडनी ,पोट  अशा नाना प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणजेच त्या
आपल्याला भोगाव्या लागतात हे माणसाला भोग आहेत तोपर्यंत ते भोगावे लागतात .तो त्यांचा आत्मिक क्लेश असतो . जेवढा भोग तो
पर्यंत सोसावा लागतो .
दुसरा आहे आदी भॊतिक यात माणसाला अचरापासून, जनावरापासून आणि माणसापासून ताप जाणवतो .तो असा तर अचर म्हणजे महापूर येणे,
भूकंप होणे ,आग लागणे, वादळ होणे म्हणजेच नॆसर्गिक आपत्ती पासून आपल्याला त्रास होतो .तो आपल्याला भोगावाहि  लागतो .जनावरां पासून
म्हणजे कुत्रा चावणे .साप,विंचू चावणे हे हि भोग आपल्या प्राक्तनात असल्यावर भोगावे लागतात आणि  माणसापासून म्हटल्यावर माणूसच माणसाचा
खरा शत्रू आहे. माणूस हि माणसाला कोणत्या न कोणत्या प्रकारे त्रास देत असतो .सासुरवास ,हुंडाबळी ,नरबळी,कटुता, हेवेदावे ,खून, मारामाऱ्या , चोऱ्या
द्वेष,मत्सर ह्यातून माणूसच माणसाला काहीना काही त्रास देत असतो .तो हि एक भोगच म्हणावा लागेल . हा ताप हि सहन करावा लागतो .
आणि तिसरा आहे आदी दॆविक  हा  जो ताप आहे तो आपल्या मृत्यू नंतर भोगावा लागतो त्यात तुमच्या पाप पुण्याची गणती होते कोणाला स्वर्गाचे दार
उघडे असते तर कोणाला नरकयातना यम यातना भोगाव्या लागतात .
तर असे हे त्रिविध ताप माणूस जन्माबरोबर त्रिविध तापाचे भोग हि आलेच अशा या त्रिविध तापाच्या झोडणीतून ,चाळणीतून माणसाला तावून सलाखून
उतरावे लागते .

सौ . अनिता फणसळकर