मन पवसाळलेले...

Started by शिवाजी सांगळे, July 24, 2014, 08:48:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




थांबला पाऊस तो
आभाळ मोकळे झाले,
गोठल्या गत स्मृतींचे
मळभ भरून आले !

चालून पाय थकलेले
चिंबगार ते भिजणे,
धरून हात ओलेते
उबदार ते थरथरणे !

ओढीने अज्ञात हव्याशा
नजरेने वारंवार पहाणे,
पुन्हा चिंब बिलगण्या
गळक्या छतात विसावणे !

मनधुंद स्वार वाऱ्यावर   
तनुगंध उष्ण श्वासांचे,
नकळत मिठीत येता
विसर ओलसर कायेचे !

करून मृदेस गंधित
पावसाने हिरवे केले,
होऊन तृप्त तरीही
मन उगी पावसाळलेले !


©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९