सुमन मालिका

Started by aap, July 24, 2014, 09:54:22 PM

Previous topic - Next topic

aap

सुमन मालिका

या कवितेत चॊदा मराठी मालिकांची सुमने ओवली आहेत . सुमन हा शब्द येथे द्विअर्थी  फुले ,चांगले मन म्हणून सुमन मालिका

माता पित्याची छाया आभाळमाया
यॊवनांत मी त्यांची तनया

गंध फुलाचा बहरून गेला रोम रोम मोहरला
माझे मन तुझे झाले जीव हा वेडावला

सळसळले मनात पिंपळपान
जुळले नाते बंधन आपुले छान

लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची

केला अट्टाहास याच साठी
जुळून आल्या रेशीम गाठी

होऊन कुलवधू मी तव घरा
ओलांडीते सोनियाचा उंबरा

झेलुनी ऊनपाऊस सुख दु:खाचा
अवघाची संसार करीन सुखाचा

वादळ वाटेवरी पडतील श्रावणसरी
उंच उंच झोका माझा गेला गगनावरी
सौ . अनिता फणसळकर