* भेट *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2014, 06:23:50 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

इकडे काळीज तिच्या विरहाने
तीळ तीळ तुटत आहे
तिकडे बांधलेले स्वप्नांचे मनोरेही
हळुहळु तुटत आहे

कसे सावरावे या प्रेमात स्वताला
की जीव निघु पाहत आहे
इकडे ओढ लागलीय तिच्या भेटीची
तिकडे दुरावा वाढु पाहत आहे

इकडे जिवापाड जपतोय मी तिला
सर्वीकडे तीच ती आहे
तिकडे झालेल्या भेटींवरही आता
पडदा त्यागाचा पडु पाहत आहे

फक्त एकदाच येउन भेट मला
की जीव माझा जात आहे
तुझ्या भेटीसाठीच मी स्वताला
तेवढे इथे थांबवुन ठेवत आहे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai