पालखीचे भोई ..

Started by Çhèx Thakare, August 01, 2014, 03:54:24 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

पालखीचे भोई ..
.
आम्ही पालखाचे भोई
पालखी आमुच्या खांद्यावर
ऊचलूनी भार जिवाचा
येई घाम या माथ्यावर
.
वाहे भार खांद्यावरी
तोल सावरून जिवाचा
भरी पोट त्याच्या वरी
आत्मा शांत या मनाचा
.
कष्टा परी जगण आमचं
पिढ्यां पिढ्या चालत आलेल
नात,  विश्वासाच आमचं
माय मातीत रूजललेल
.
अवघे छञपतींना सुद्धा
आम्ही खांद्यावरी नेले
त्यांच्या छायेखाली आम्ही
कर्म आमुचे वाहीले
.
चला सर्वांनी चला हो
भार मिळून नेऊया
एकजुटी ने मिळून
भोई पालखीचे होऊया
.
©  चेतन ठाकरे 

विक्रांत

मनातल लिहले आहेस छान

Çhèx Thakare