एक दुर्दैवी कहाणी

Started by Pravin Raghunath Kale, August 05, 2014, 03:36:00 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale


कोसळणा-या पावसाला
काय दुःख सांगू
पाण्यासोबत डोंगरही
आज लागले वाहू

त्या डोंगराच्या दरडीखाली
पूर्ण गाव गाडलं
निर्सगाच्या क्रोर्यापुढे
दैवही आज अडलं

घरादारां सोबत आज
पाट वाहीले माणसांचे
मोजूच नाही शकणार
दुःख त्या जीवांचे

आज या पावसाला
एक नम्र विनवणी
का बदलली रे
ही अशी कहानी...





माळीण दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तीना भावपूर्ण श्रद्धांजली


प्रविण रघुनाथ काळे
8308793007