कारे देवा? (अर्थात माळीण घटणे नंतर)

Started by शिवाजी सांगळे, August 05, 2014, 05:17:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


झाला गाव रीता सारा
आता उरल्या आठवणी,
माय, बाप सारे गेले
ठेउनी चिखलात निशाणी !

कारे असा कोप केला?
सांगशील कारे देवा,
रागा, लोभाचे पण नेले
कुणासाठी येवू गावा?

कधी काळी खेळलो इथे
झोपळा, हुतूतू, लगोरी,
उरली सुध्दा नाही येथे
बांधाया तिरडीस दोरी !

टाकून इथे माती फक्त
मिटवालं अवशेष पसारा,
विसरू कस बाल्य माझं?
देवून गेला गाव सारा !

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९