तु अन माझ मन

Started by Rahul bhamare, August 05, 2014, 10:36:12 PM

Previous topic - Next topic

Rahul bhamare

रोज सकाळी ऊठाव अन तुझी आठवन यावी..
अन मनाने लगेच स्वताला मनाव 
" बस गप "

रस्त्याने जाताना काहीतरी बघाव अन वाटाव कि तुझ्यासाठी घ्याव  अन लगेच मनाने मनाव
" बस गप "

एकांतात बसलेलो असताना वाटाव की तू सोबत राहीली असती तर..अन मनाने मनाव
" बस गप "

का कुणास ठाऊक पण सगळीकडे तुझ दिसावी अन मनाने मनाव
" बस गप "

कोणीही हसल तरी तूझ हसण आठवाव अन मनाला छान वाटाव ...
वाटाव कि हसण कॉपीराइट करता आल असत तर.. अन मनाने मनाव 
" बस गप "

वाटत कि पुर्ण कॉलेज रोड तुला विकत घेऊन द्यावा अन मनाने पून्हा मनाव " बस गप "

तुझ हसन... लाजण... केसांशी खेळण... गालाला हात लावण... सर्वच अप्रतीम, अन मनाने लगेच मनाव
" आहेच ती सुन्दर एखाद्या परी सारखी "
                            - राहूल भामरे