तेजस्वी सुर्यतारा

Started by amit.dodake, August 10, 2014, 11:19:18 PM

Previous topic - Next topic

amit.dodake


पाठमोरी तू .........मी हरलेलो ......
अश्रू अनावर......मी कोडमडलेलो
त्या वाटेच्या  ..... त्या वळणावर
शेवटचा तो  ......  आघात हृदयावर


नकोनकोसे क्षण.......ते निसटणारे
उठले काहूर ....... आभाळ रडणारे 
पाहून मजला ..... हलवलास हात
गेलीस निसटून.....सोडून साथ


घेतल्या शपथा  .....ज्या चांदरातीला
कस हे......... बदलल मग?
चांदराती च्या ....... त्या शपथेचा
शब्दन शब्द ...... आठवून बघ .....


भावनाविवश मी...मी संपणारा
मी विझलेला .......तुटलेला तारा ...
पुसले अश्रू...... एकदा शेवटचे
उठून उभा .......तेजस्वी सुर्यतारा


-फुलपाखरू

amit.dodake

एका ओळीत जास्तीत जास्त चार शब्द लिहण्याचा प्रयत्न केला ....... आवडला तर नक्की सांगा :)