कसं सांगू कायं सांगू या जगास

Started by madhura, August 16, 2014, 10:32:40 AM

Previous topic - Next topic

madhura


I am fan of संजय एम निकुंभ....sharing one of his awesome poems....do read.


बघं ना प्रिये
काय झालीय माझ्या मनाची अवस्था
तुझं नांव तर
ओठांच्या या बंद पाकळ्यात
बंदिस्त करून ठेवलंय मी

तुझं अन माझं प्रेम
या जगासमोर कधीच
उघड होणार नाही
तुला शब्द दिलाय मी

कारण इतकी निरागस प्रीत
असू शकते यावर
जग विश्वास तरी कसं ठेवणार
हे तुलाही माहित आहे अन मलाही

तुझ्यातच डूबलेला असल्यानं
मी करत रहातो कविता
पण हे जग आता विचारायला लागलंय
ती कोणं म्हणून

मी एकच सांगतो जगास
तुम्हीही हि धुंदी अनुभवा
माझ्या प्रेम कवितांमधून
कारण जिच्यावर मी प्रेम करतो
ती फक्त वहात राहणार आहे माझ्या नसानसातून .
==============================
===
-- संजय एम निकुंभ ,

Çhèx Thakare