पापण्या

Started by madhura, August 16, 2014, 12:03:52 PM

Previous topic - Next topic

madhura

जागेपणी तयांची होई उघडझाप
  मोजण्या तयाला नसे काही माप !!

  सौंदर्य दाविण्या नयनांसी
  असती तयार बनुनी दासी
एकाच हालचालीने ईशारा देती जगतासी !!

कमनीय बांधा तयांचा
  अग्रभागी केश रचनेचा
मिचकाविता बोध होई प्रियजनासी !!

नको ते सामोरी येता
  अडविती पापण्या  मिटुनी
बंद पापणीने  आकर्षती  चित्रकारासी !!

दमछाक होता तयांची
  आपसूक द्वारे मिटुनी
शांतपणे पहुडता आठव देती स्वप्नांसी !!

-जयंत