डायरीतून .. (६) [१/२]

Started by Çhèx Thakare, August 17, 2014, 01:23:56 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

डायरीतून ... (६)  [१/२]
.
.
मुलगी हि विजे सारखी असते
ऐकले होते
आज माञ पटलंच पुर्ण
काय चटक असते राव,  तो स्पर्श,  ते चटके,  तो अनूभव
.
अनूभव कसला  ..?, एक असा क्षण ज्याचे कित्येक जण वाट पाहून असतात पण अनूभवता माञ येत नाही
.
आज खुप छान दिसत होती,
पंजाबी ड्रेज मोरपंखी रंगाचा,  त्यावर काळी ओढणी, कानात बारीक चमकणारे टाप्स,  बरोबर दोन्ही डोळ्यांच्या आत गंध लावलेला,  भुवयाही अगदी लोभस,  डोळे तसेच पाणीदार,  एकटक पाहतच रहावं असं,  ते ओठ काय शुभ्र गुलाबी रंगाचे,  त्यात तिच ते अल्लड हसणं,  ती खळी तर नुसतीच वेड लाऊन सोडायची
.
खरच परमेश्वारानं जर ठरवलं तर तो अप्रतिम प्रतिबिंब तयार करू शकतो,  हे ही त्या पैकी एक असावं
.
पोरगी काय दिसत होती रावं
पोरगी sss! 
परीच दिसत होती डिट्टो
.
मी  ..?
सालं पँट तिच तिन दिवसा पासून  जुनी घातलेली ,  तो शर्ट जुनाच,  फुल डियो मारलेला,  मस्त क्रिम पावडर मारून आलेलो  चकाचक,  पण तिच्या पुढं एकदम फिक्क
.
त्यावेळी तिच्या सोबत मी म्हणजे  येड्याच्या हातात तलवार 
.
दुसरी पोरं तर अशी पाहत होती जशी कधी पोरगीच नाय पाहीली,  त्यात माझ्याकड पाहून तर पाहतच रहायची
माझा तर तिथच भडका व्हायचा

.
मि तिथून तिला घेऊन गेलो
चालताना तिने नकळत हतात हात घेतला,  मी तिच्याकडे पाहीले अन हसलो,  तिही डोळे हलवून लाजली
.
चालताना माझी छाती फुगून आली होती, मी पार्किंग जवळ आलो,  तिची गाडी होती
.
गाडीत बसलो,  मला काय फोर-व्हील येत नव्हती ( आमच्या वडीलांना पण कधी आली नव्हती )   

तिच्याच हातात शेवटी स्टेरींग
.
तिन माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्या ऊजव्या कानाला स्पर्श करायला लागली,  गुदगुल्या होत होत्या

मि तिच्या खांद्यावर हात ठेवला तिला जवळ ओढले

[१/२]


©  चेतन ठाकरे