डायरीतून .. (८)

Started by Çhèx Thakare, August 17, 2014, 01:30:26 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

डायरीतून ... (८)
.
.
*नात्या मधे कधी कधी एक वेळ अशी येऊन जाते कि ते नाते नकोच वाटते,  सतत मनाविरूद्ध होणारया गोष्टी,  मानसिक ञास,  तोच तोच अगदी नकोसा वाटत जातो *
.
" काय ग तो रोहित कोण आहे "
" सांगीतले ना क्लासमेट आहे "
" ते मला पण माहीत आहे पण तो ईतक्या कमेंट, लाईक , तु पण त्याचे फोटो लाईक करतेय, तो पण तुझे करतोय काय चाल्लय काय नेमकं ..? "
.
" अरे तसं काही नाही, वि आर जस्ट फ्रेंड "
" जस्ट फ्रेंड  ..?,  आय डोंन्ट थिंक सो "
" आय डोन्ट केअर, वाटेव्हर यू थिंक ,  बाय, गुड नाईट "
.
मला डायरेक्ट बाय
तु काय करतेस,  मिच तूला बाय करतो, चल हट्ट
.
काय असा तसा वाटतो का,  सगळे काम स्टडी सोडून तुला मेसेज करायचा त्यात तुझे एक एक नखरे पहायचे,  काय वेडा वाटलो का ..?
.
.
मी तर आता मेसेजच करनार नाही,  जे होईल ते होईल
.
मला नाय फरक पडत
मलाच फरक पडतो तिला काय ..?, तिला दुसरा कोणी भेटला ना,  आम्ही काय आम्ही मुर्ख बाकी काय नाय
.
*कधी कधी एक वेळ अशी येते कि ज्या व्यक्तीवर आपण ईतके प्रेम करतो त्या व्यक्ती ईतका वाईट व्यक्ती दुसरा कोणीच नसतो*
.
*सुरवातीला हवाहवासा वाटणारा भास
अंतरीला माञ खूपच ञास देऊन जातो, आणि मग मन म्हणते कि या गोष्टींना कुठेतरी पुर्णविराम देण्याची वेळ आलीये*
.
©  चेतन ठाकरे