द्वेगात जन्म देवा

Started by विक्रांत, August 17, 2014, 01:37:03 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

येवू दे कुठूनही
सारी वेदनाच आहे
विझविण्या सामर्थ्य
पण फुंकरीत आहे

जगण्याच्या मालका 
देणे तुज हा कर आहे
मरणकाळी वेळी अवेळी
सारेच पण माफ आहे

प्रत्येक गाणे चांगले
असे कुठे होते का ?
सारेच जुगारी जिंकति
असे कधी घडते का ?

वाटते तयांस की हा
साराच खेळ मजेचा
रुतती हाडात बेड्या
प्रकार असे सजेचा

सारेच सुज्ञ येथे
सारेच जरी जाणते
प्रत्येक प्रवचनात
सत्य दडुनी हासते

दे भीतीला मिठी वा
घे करुनि गढी वा
घडणारे घडतेची ना
द्वेगात जन्म देवा


विक्रांत प्रभाकर