माफ कर

Started by Sachin01 More, August 20, 2014, 11:03:52 AM

Previous topic - Next topic

Sachin01 More

आई आज शब्द खुप बेईमानी ठरताहेत
तुझ्याविना दुसर्याचाच विचार करताहेत,
शब्दाचे बोल आज मलाही रडवताहेत,
तुझ्यासाठी मनासोबत तेही भांडताहेत,
आई तुझ्या पदरात मीच खेळलो होतो ,
बालपणी तुझ्याशीवाय कुणाचाच नव्हतो,
झालो कळता पण केली माझ्यावर करणी,
आज आई तुझ्याशिवाय तिचाच विचार मणी,
छोटेपणी होतो मी तुझ्या लाडका बाळ,
रात गेली की जशी होते सकाळ,
गोड जन्मी माझ्या अवतरला काळ ,
माफ कर आई तुझा न राहीला ग बाळ.
  --S.S.More
Moregs