सखी तुझे स्वप्न ...

Started by विक्रांत, August 20, 2014, 11:33:27 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

घनदाट काळोखात
वीज चमकली
क्षणभर सारे जग
लख्ख दिसले
अद्भूत सुंदर विशाल
चंदेरी प्रकाशात न्हाईलेले
आणि काहीसे 
कातर भयव्याकूळ 
गडद सावलीची
किनार ल्यायलेले
मिटेमिटे पर्यंत डोळे
क्षणात सारे विझले
अन कानावर आदळले
आकाश दुभंगले
त्या कडकडाटी आवाजाने
अस्तित्व हादरले
काळीज फाटत गेले

सखी तुझे स्वप्न
असेच काही होते
पुन्हा माझी जाग
घनघोर बरसणे होते

विक्रांत प्रभाकर