तरही गझल

Started by madhura, August 23, 2014, 11:55:02 AM

Previous topic - Next topic

madhura

जाणुनीबुजुनी यशाला काल हुकलो मी!
वाटले दुनियेस की, बहुतेक चुकलो मी!!

पांडुरंगाचा किती हा ध्यास जीवाला.....
पायरी येताच आपोआप झुकलो मी!

कोण जाणे कोणत्या धुंदीमधे होतो.....
भोवती होतो घराच्या, ज्यास मुकलो मी!

वाटले दुनियेस डेरेदार मी झालो......
एकटा मी जाणतो....आतून सुकलो मी!

माझिया भात्यात होते बाण रामाचे.....
नेमके संधान करतानाच हुकलो मी!

-------प्रा.सतीश देवपूरकर

वृत्त: राधा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गा
मतल्यातील दुसरी ओळ नीलेश कवडेंची