संगत

Started by SANJAY M NIKUMBH, August 23, 2014, 04:05:28 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

संगत
================
तुझ्या आठवणींची संगत
रंगत आणते जीवनात
दिसतेस तू क्षणो क्षणी
माझ्या मनाच्या काळजात

एकेक मोर पिसारा
आठवतो तुझ्या आठवणींचा
हे जग निजते रात्री
तुला पाहतो मी पापणीत

तुझ्या आठवांच्या झुल्यावर
झुले मन वेडे माझे
असतेस तू जवळी
माझ्याच सावलीत

तू सोबत आहे अशी
जसा श्वास माझ्यात
हे जगणे झाले सुंदर
तू आहेस आयुष्यात
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २३. ८. १४  वेळ : ४. ०० दु .