सर्वस्वाचे दान कर...

Started by Ankush S. Navghare, Palghar, August 23, 2014, 09:00:10 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

एकदा तरी नझर टाक
एकदा तरी चोरून बघ
एकदा तरी शिरून डोळ्यांत
ह्रुदयात माझ्या उतरून बघ

एकदातरी साद घाल
एकदा तरी हाक मार
एकदा तरी माझ्यासाठी
वेळ तुझा घालवून बघ

एकदातरी वाट पहा
एकदातरी वेळ वाहा
एकदातरी माझ्यासाठी
येर्याझार्या घालून बघ

एकदातरी स्पर्श कर
एकदातरी मिठीत धर
एकदातरी माझ्यावर
चुम्बनांचा वर्षाव कर

एकदातरी जागी हो
एकदातरी माझी हो
एकदातरी माझ्यासाठी
सर्वस्वाचे दान कर...
सर्वस्वाचे दान कर...
... अंकुश नवघरे.©
(स्वलिखित)
२३/०८/२०१४
स. ११.०५

Çhèx Thakare


Ankush S. Navghare, Palghar


kuldeep p