तुझे भास पावसाचे

Started by श्री. प्रकाश साळवी, August 24, 2014, 12:50:49 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तुझे भास पावसाचे

तुझे भास पावसाचे
जणू फूलावी जाई-जूई
थेंबात पावसाच्या
प्रीत आपुली फूलून येई ।।1।।

तुझे भास पावसाचे
शब्द हे भरून यावे
गाणे माझ्या मनातले
हलकेच जूळून यावे  ।।2।।

तुझे भास पावसाचे
स्वप्नी तूच यावे
प्रीतीत पावसाच्या
चिंब भिजून जावे ।।3।।

तुझे भास पावसाचे
मातीस गंध फूलांचा
प्रितीस गंध यावा
तूझ्या अनोख्या साहसाचा ।।4।।

तुझे भास पावसाचे
भासते तू आसपास
येई पुन्हां फिरोनी
तोडून सर्व पाश ।। 5।।

श्री. प्रकाश साळवी,
दि.24/08/2014

Çhèx Thakare


शिवाजी सांगळे

तुझे भास पावसाचे... सुंदर अनुभव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९