स्वप्नातला हरिहर

Started by prathamesh.manmode, August 24, 2014, 02:42:11 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

मी सर केलेल्या गडदुर्गांपैकी हा गड थोडा वेगळाच जाणवला.. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात मोठ्या दिमाखात उभा आहे त्र्यंबक रांगेतील हा प्रमुख किल्ला मानला जातो या किल्ल्याची वाट निरगुडपाडा या गावापासून सरळ गडाच्या माथ्यावर पोहोचते हि वाट मध्यम श्रेणीची आहे.

प्रवास
किल्ला लवकर सर करण्याचे ठरले होते त्यासाठी पहाटे न निघता रात्री २ च्या सुमारास आम्ही निघण्याचे ठरविले, म्हणजे किमान ७ पर्यंत आम्ही गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचू आणि गड चढाई चालू करू पुण्याहून किल्ला २०० किमी अंतरावर आहे जाण्या साठी उत्तम साधन हे स्वताचेच असले पाहिजे
त्र्यंबकेश्वर वरून २० मैल अंतरावर निरगुडपाडा हे गाव आहे येथूनच आम्हीही गड सर करण्याचे ठरविले. गडमाथ्यावर पोहोचण्यास १.३० तास पुरेसा आहे पण पावसाळ्यात किमान २ तास लागतात

गड चढाई

निरगुडपाडा या गावातून चढाई चालू केली पहिले थोडे अंतर सरळ सुसाट आहे पण थोडे खडतर आहे मध्ये दोन वाहते झरे ही आहेत पण हे झरे पावसातच वाहतात. नंतर थोडी चढाई आहे वाट थोडी जास्तच घसरडी आहे पण आपण ती काळजीने आणि थोड्या हिमतीने सहजतेने सर करू शकतो गडावर जाण्यास २ टप्पे लागतात पहिला टप्पा थोडा जास्त चढाईचा आहे आणि दुसरा कमी चढाईचा
आहे हा टप्पा सर केल्यावर आपण कातळ भिंतीपाशी पोहोचतो या कातळात ज्या पायऱ्या खोदल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत आणि ठिकठिकाणी आधारासाठी खोबण्या (हाताने पकडावे इतके लहान खड्डे) सुद्धा कोरलेल्या आहेत या पायऱ्या चढून गेल्यावर पहिलाच एक दरवाजा लागतो तिथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो तिथून पुढे एक कातळभागात कोरलेली कपार आहे या कपारीतून जायला थोडे वाकून जावे लागते. तिथून थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायऱ्या लागतात या पायऱ्या ही तितक्याच अवघड आहेत तितक्या पहिल्या दरवाज्याच्या आहेत. या पायऱ्या चढताना गुहे मध्ये चालल्याचा भास होतो कारण या पायऱ्या अर्ध्या कातळाच्या अंतर्भागात आहेत पुढे जाउन आपल्याला मुख्य दरवाजा लागतो या दवाज्यातून आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो पठारावर एक उंचवटा आहे थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यासाठी वापरू शकता.. येथून थोडे पुढे गेले कि दगडाची १० बाय १० च्या अश्या दोन खोल्या आहेत तिथे १०-१५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते पण पावसाळ्यात पाणी आत शिरते त्या खोल्यांना चिटकून ४-५ पाण्याच्या टाक्या आहेत त्यातील २ टाक्यांचे पाणी पिण्याच्या वापरात येऊ शकते गड माथा तसा लहान असल्याकारणाने १ तसा मध्ये गडमाथा फिरून होतो. आणि उतरताना सावधानता बाळगावी ही महत्वाची बाब आहे तिथे वारा भयाण असल्याकारणाने तोल जाण्याची शक्यता भासते..

हा किल्ला प्रत्येक ट्रेकरची स्वप्नपूर्ती ठरू शकेल


माझे ६ महिने मी हा किल्ला सर करण्याची वाट पहिली अखेर १६/८/२०१४ रोजी हा किल्ला मी सर केला...