सखे पुन्‍हा माझ्या जीवनात येशिल का.........!

Started by Vira, August 31, 2014, 04:58:17 PM

Previous topic - Next topic

Vira

सखे पुन्‍हा माझ्या जीवनात येशिल का.........!



सांग ग सखे......
येशिल का पुन्‍हा माझ्या जीवनात,
पुन्‍हा भेटेल का जागा
मला तुझ्या तुझ्या मनात,

तयार आहे मी पुन्‍हा
तुझ्यासाठी इतरांशी भांडायला,
तयार आहे मी पुन्‍हा
तुझ्यामागे वेड्यावाणी फिरायला,

फिरता फिरता एकांत भेटला की
खुप प्रेम आहे ग माझ तुझ्यावर
मला सांगायच आहे,
तुझे ते काही न बोलता घाबरुन निघुन जान बघुन
थोड मलाही घाबरायच आहे,

तुझा होकार भेटल्‍यावर
तो झालेला आनंदा मला पुन्‍हा अनुभवायचा आहे,
तु नको नको सांगुनही
तुला पुन्‍हा एकदा मिठीत भराय आहे,

मग तयार आहे मी......
तुझ ते अचानक सोडून गेल्‍यावर
तुझ्या विरहात जगायला,
तयार आहे मी
जीवनभर तुझ्या आठवणीत झुरायला,

माझी जीव देऊन परत फेड करेल ग....
फक्‍त माझ्यावर एक उपकार करशिल का,
सखे......
पुन्‍हा माझ्या जीवनात येशिल का,
सखे पुन्‍हा माझ्या जीवनात येशिल का.

- विरा