मी कां यावे तुझ्यासवे

Started by SANJAY M NIKUMBH, August 31, 2014, 06:18:53 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी कां यावे तुझ्यासवे
-------------------------------------------
काळोख दाटलेला तू पडतोय मनसोक्त
तरी कां सुने सुने वाटे मज आज

तुझ्या पहिल्या येण्याची अधीरता मनातली
कुठे हरवून गेली सांग तूच मज

कां वाटते असे की तू एकटाच आलाय
कोठे दिसेना तिचा चेहरा मला थेंबा थेंबात

येवूनी तू मुसळधार मीच कोरडा कां
माझी प्रीत कोठे लपली कळेना मज आज

तो गंध तुझ्यासवे येत होता तिचा श्वासास
तो कुठे हरपलाय सांग तूच आज

कां रे पावसा असा केलास तू गुन्हा
तिला ठेउनी कां आला तिच्या घरलाच

मी कां यावे तुझ्यासवे नेहमीसारखे खेळायला
होता बहाणा खेळण्याचा होती भेटण्याची आस तिलाच 

तू पडतोय तरीही भिजण्याची नाही उर्मी
ती नाही तुझ्यासवे म्हणून सुने सुने वाटे मज
====================================
संजय एम निकुंभ , वसई
दि . ३१. ८. १४  वेळ : ५. ४५ संध्या .